हातात तिरंगा आणि 'मोदी...मोदी...'च्या घोषणा; अमेरिकेत पंतप्रधानांचे जंगी स्वागत

2021-09-23 473

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एअर इंडिया वन या विशेष विमानाने भारतातून अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केलं होतं. भारतीय वेळेनुसार आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोदी अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. येथील जॉइण्ट बेस अँण्ड्रूस विमानतळावर भारतीयांनी मोदींचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं.

#NarendraModi #JointBaseAndrews #QuadLeadersSummit #WashingtonDC #USA #NarendraModi #76thUNGA #JoeBiden #Qualcomm #FirstSolar #GeneralAtomics