सातारा : सध्या सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने सातारा शहरातील विकासकामांचा श्रेयवाद उफाळून आलाय. खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर 'गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी' CRF निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या 15 कोटीच्या मार्गाचा शुभारंभ 22 तारखेला घेणार असल्याचे बॅनर लावले. या त्यांच्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीने त्याच्या बाजूलाच थेट बॅनर लावत काम कुणाचं आणि नाचतंय कोण? असा प्रश्न विचारत कधी तरी खरं बोला असा बॅनर लावला आहे. त्यामुळे निवडणूकच्या तोंडावर आता पुन्हा राजकीय वाद उफाळून आल्याचे चित्र आहे. (व्हिडीओ : प्रमोद इंगळे