पंकजा मुंडेंना नक्की कोणाचा राजीनामा हवा आहे? Dhananjay Munde | Nitesh Rane | Anil Deshmukh Resigned

2021-09-13 0

आज गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि त्यावरुन राजकारणाला सुरुवात झाली. संजय राठोडांनंतर राजीनामा देणारे अनिल देशमुख हे ठाकरे सरकारमधील दुसरे मंत्री ठरलेत. यावर व्यक्त होत भाजपच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांचा विशेषत आपल्या राजकीय विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला गेला... अनिल देशमुखांच्या ट्विटनंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांना अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.. गृह मंत्री यांचा राजीनामा' देर आये पर दुरुस्त नहीं आये ', या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल.. असं ट्विट पंकजा मुंडें यांनी केलं.. यावरुन असा प्रश्न उभा राहतो की, पंकजा मुंडेंना नक्की कोणाचा राजीनामा हवाय. कारण सामाजिक न्याय मंत्री असलेल्या धनंजय मुंडेवर देखील अत्याचाराचे आरोप झाले होते. एका महिलेने त्याच्यावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून झाली होती. पण त्यावेळी त्याचा राजीनामा घेतला गेला नव्हता. पण यामाध्यमातून पंकजा यांनी नक्कीच पुन्हा त्याविषयाला फोडणी दिली की काय असा प्रश्न सर्वांना पडलाय..

#lokmat #Pankajamunde #Dhananjaymunde #Niteshrane #Anildeshmukh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires