Amravati: चायनीज खाताय सावधान! अजिनोमोटो वापरल्यावर काय होतं पाहा.

2021-09-20 4

Amravati: लहान मुलांसाठी अजिनोमोटो धोकादायक आणि हानिकारक असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. असं असतानाही अमरावती शहरात चायनीजच्या गाड्यांवर सर्रासपणे अजिनोमोटोचा वापर सुरू आहे. टेस्टींग पावडर म्हणून ओळख असलेला अजिनोमोटो आरोग्याला हानीकारक असताना चायनिज पदार्थांमध्ये याचा सर्रास वापर करण्यात येतो. त्यामुळे अनेकांमध्ये पोटाचे विकार बळावतायत. चायनिज खाण्याची आवड लहान मुलांसह तरुणांना अधिक असते. चायनिजबरोबर अजिनोमोटोचा वापर अतिप्रमाणात होत असल्यानं तो शरीरासाठी हानीकारक ठरून त्यांना न कळत पोटाचे विकार होत असल्याचं समोर आलंय. अजिनोमोटोला एमएसजी म्हणजेच मोनो सोडियम ग्लूटामिट असं म्हणतात. चायनिजबरोबर नॉनव्हेज, तसेच इतर भाज्यांमध्येसुद्धा अजिनोमोटोचा वापर सर्रास केला जातो. अतिप्रमाणात सेवन केल्यास यामुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटीनं वाढतो. तसेच आतड्याचे, पोटाचे कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
#amravati #amravaticity #chinesefood #harmfullchinesefood #chinesefood #streetfood #streetfoodindia

Videos similaires