Karad: मुंबई पोलिसांनंतर किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतले ताब्यात

2021-09-20 38

कऱ्हाड (सातारा) : आज (ता. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कऱ्हाडात ताब्यात घेतले. कोल्हापूर व सातारा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. मुंबईवरुन किरीट सोमय्या कोल्हापूर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना मुंबईपासून पोलिसांनी फाॅलोअप केला होता. त्यावेळी कऱ्हाडला थांबण्यास ते तयार झाले. कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी केलेल्या विनंतीनुसार, पहाटे पावणेपाच वााजता भाजप नेते माजी खासदार सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कऱ्हाडला उतरले आहेत. प्रशासन आणि पोलीस माझे शत्रू नाहीत, त्यांच्या विनंतीनुसार मी उतरत आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली. येथील शासकीय विश्रामगृहात ते थांबले असून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत. काल कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना ४ तास स्थानबध्द केलं होतं, यावेळी पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाचीही झाली होती. (व्हिडिओ : सचिन शिंदे)
#kiritsomaiya #narendramodi #bjp #uddhavthackeray #shivsena #sanjayraut

Videos similaires