महाविकास आघाडी सरकार कोसळणार आणि पुन्हा भाजप सत्तेत येणार, ही गोष्ट आपण गेल्या दीड वर्षांपासून नेहमीच ऐकतो.. भाजपचे नेते दरवेळी सरकार पाडण्याची भाषा करतात, वेगवेगळे दावेही करतात.. तर महाविकास आघाडीत थोडी धूसफूस असली तरीही सरकार पाच वर्ष टिकेल, असं सत्तेतील तिन्ही पक्षांकडून सांगितलं जातं.. आता महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन लोटस होणार असल्याची चर्चा आहे.. त्याच कारण ठरलंय एक दुसरंच राज्य.. काही दिवसांपूर्वी पुडुचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला, याठिकाणी मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं, त्यानंतर पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळलं, या राजकीय घडामोडींमुळे आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु झालीय.. काही दिवसांपुर्वी भाजपचे नेते म्हणाले होते की, बंगाल निवडणूक आणि शेतकरी आंदोलनानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवलं जाणार आहे.. पण कसं हा मात्र मोठा प्रश्न आहे... कारण भाजपला महाराष्ट्रात सत्तेत यायचं असेल तर आमदार नाही तर पुर्ण पक्षच फोडावा लागणार आहे.. यानंतर आता शिवसेनेकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आलीय..
#lokmat #MahaVikasAghadiGovernment #OperationLotus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat