Tukaram Mundheची पुन्हा बदली हा BJPचा विजय ? Maharashtra News

2021-09-13 4

अखेर उध्दव ठाकरे सरकारही राजकीय पक्षांच्या दबावापुढे झुकलं ..अखेर तुकाराम मुंडे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून पुन्हा बदली करण्यात आली आहे. त्यांना पुन्हा मंत्रालयात बोलावण्यात आलंय.ईथंही त्यांनी आपल्या नियुक्तीचं एक वर्षही पूर्ण केलं नाही .ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर मुंडे यांना नागपूरला पाठवण्यात आलं होतं. सरकारलाच अजून एक वर्ष पूर्ण झालं नाही. मुंडेंना मात्र त्याआधीच पुन्हा मंत्रालयात बोलावण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी पदभार स्वीकारला होता. एक वर्ष पूर्ण होण्या अगोदरच आठ महिन्यांत त्यांची बदली करण्यात आलीय. अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यासंदर्भात बुधवारी आदेश जारी केले. मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई येथे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर राधाकृष्णन बी. नागपुरचे नवीन मनपा आयुक्त राहणार आहेत. तुकाराम मुंढे यांची नागपुरातील कार्यकाळदेखील वादग्रस्तच राहिला. लोकप्रतिनिधींनी सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. इतकेच काय तर त्यांच्यावर ‘हुकूमशहा’ अधिकारी अशीदेखील टीका करण्यात आली. दुसरीकडे ‘कोरोना’ संसर्गासंदर्भात मुंढे यांनी सुरुवातीच्या काळातच तातडीची पावले उचलली होती. त्यामुळे सुरुवातीची चार महिने नागपुरात ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात राहिला होता. मागील काही काळापासून मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष पेटला होता. नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनीदेखील मुंढे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे मंगळवारीच मुंढे यांनादेखील ‘कोरोना’चा संसर्ग झाला असल्याची बाब समोर आली होती. खुद्द मुंढे यांनीच ही माहिती दिली होती.

#lokmat #Tukarammundhe #Maharashtranews #Bjp
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Late

Videos similaires