किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खाणापूर गावातील पाणवठ्याजवळ चार ते पाच महिन्यांचे मगरीचे पिल्लू आढळले आहे. वनविभागाने तयार केलेल्या प्राथमिक बचाव पथकाच्या जवानांनी (पीआरटी) या मगरीच्या पिल्लाला पकडले असून ते त्याला कात्रज प्राणी संग्रहालयाच्या ताब्यात देण्यासाठी घेऊन गेले आहेत. या परिसरात आणखी मगरीची पिल्ले व मोठ्या मगरी असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (निलेश बोरुडे)
#crocodile #khadakwasla #crocodilefoundnearkhadakwasla #crocodile