सिन्नर(नाशिक): गेल्यावर्षी शेतकरी संपावेळी दूध दराबाबत दिलेले आश्वासन शासनाकडून पाळले जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा दूध उत्पादन व्यवसाय मोडकळीस आला असून संघांना दुधाला 27 रुपये दर देणे बंधनकारक करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व पंचायत समिती याठिकाणी अधिकारी, कर्मचारी व आलेल्या नागरिकांना मोफत दूध वितरण करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat