सातारा - ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. या गावात विविध प्रकारची तब्बल पाच हजार झाडे लावण्यात आली असून, ग्रामस्थांच्या एक तपापासून सुरू असलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला ख-या अर्थाने फळे येऊ लागली आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews