कसबे सुकेणे (नाशिक) : रंगाची उधळण, भक्तीचा जल्लोष आणि भाविकांची मांदियाळी अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोउत्तर रंगी रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे पाऊण भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. रंगाची यात्रा म्हणून सर्वदूर परिचित ही यात्रा परिचित आहे.