उल्हासनगर - सर्व दुकानदार दोन हजार, एक हजार व पाचशेच्या नोटा तपासून घेत असल्याने एका रिक्षाचालकाने शक्कल लढवत १०० रूपयांच्या नोटा बनवण्याचा छोटा कारखानाच सुरु केल्याची घटना उल्हासनगर मध्ये समोर आली आहे. घरीच थाटलेल्या या कारखान्यात हा रिक्षाचालक १० मिनिटात शंभरची नोट बनवायचा. तो एका महिलेच्या मदतीने शहरातील मार्केटमध्ये या बनावट नोटा चलनात आणायचा. याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर या आरोपीने पोलिसांसमोर १० मिनिटात बनावट शंभराची नोट बनवण्याचा डेमो दाखवत आपला गुन्हा कबूल केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews