नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाईन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलामुळे. या उड्डाणपुलाची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे उड्डाणपुलाखाली जागेवर करण्यात आलेल्या सुशोभीकरणात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव यापासून ते समाजप्रबोधनाचे संदेशही देण्यात आले आहेत.