अमेरिकेची सुप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. खुद्द लेडी गागाने आपल्या सोशल अकाऊंटवर ही वाईट बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय, लेडी गागाला शारीरिक व्याधींनी घेरले आहे. यामुळे तिला आपला जॉन वर्ल्ड टूर रद्द करावा लागला आहे. आपल्या आजारपणामुळे लेडी गागाला या वर्ल्ड टूरचे शेवटचे १० शो रद्द करावे लागले आहे. लेडी गागा ही गाण्यांसोबत तिच्या चित्रविचित्र स्टाईल व कपड्यांसाठी ओळखली जाते.शो रद्द केल्याबद्दल लेडी गागाने आपल्या चाहत्यांची क्षमा मागितली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews