मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाच्या भुयारी कामाला माहिम येथील नयानगरमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. माहिम येथून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा भुयारी मार्ग खोदण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा असून, मेट्रोच्या संपूर्ण भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. मेट्रो-३ प्रकल्पाचे खोदकाम टनेल बोअरिंग मशिनच्या मदतीने केले जात आहे. ‘कृष्णा वन’ या मशिनद्वारे आतापर्यंत १२० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून, ‘कृष्णा टू’ या मशिनद्वारे आतापर्यंत ७० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.