धर्मा पाटील यांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार - अशोक चव्हाण

2021-09-13 1

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Videos similaires