टेनिसचा बादशहा Roger Federer यांचा हा Video पाहिलात का ? हसून हसून लोटपोट व्हाल याची हमी

2021-09-13 0

टेनिसचा बादशहा रॉजर फेडरर जेव्हा कोर्टमध्ये उतरतो तेव्हा त्याच्यापुढे प्रतिस्पर्ध्यांच्या निभाव लागणं तसं अवघडच. त्याला खेळताना पाहणं म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी आणि टेनिसप्रेमींसाठी वेगळी पर्वणीच असते. नुकत्याच पार पडलेल्या हॉपमन कप टुर्नामेंटमध्ये रॉजर फेडरर आणि बिलिंडा बेनचीच हिनं मिश्र दुहेरी फेरीत जॅक सॉक आणि कोको यांचा पराभव केला. या सामन्यातील या व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. हे दोघं एकमेकांविरुद्ध खेळत असताना आपण मिश्र दुहेरी सामन्यात खेळत असून आपल्या सोबत महिला टेनिसपटूदेखील आहेत याचा जणू या दोघांना पुरेपुर विसर पडला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires