घाना देशाच्या इमिग्रेशन सर्व्हिसने भरतीप्रक्रियेसाठी काही नवे निकष जाहीर केले असून, त्यानुसार प्रसूतीनंतर आलेले स्ट्रेच मार्क्स म्हणजे चट्टे असलेल्या, तसेच रंग उजळण्यासाठी ब्लीचिंगचा वापर करणाऱ्या महिलांना भरतीपासून मज्जाव करण्यात आला आहे.सोशल मीडियावर यावर सडकून टीका होत आहे. तसेच अनेकांनी या निर्णायावर आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी समर्थनही केले आहे. इमिग्रेशन सर्व्हिसच्या कामाचे स्वरुप अत्यंत खडतर आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षणही कठोर स्वरुपाचे आहे. त्यामुळे तुम्ही त्वचा ब्लीच केली असेल किंवा त्यावर स्ट्रेच मार्क्स असतील तर त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते असे घानाच्या इमिग्रेशन सर्व्हिसचे प्रवक्ते मायकेल अमोको-अटाह म्हटले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews