तुम्ही ATM मधून पैसे काढता ? | मग तुम्हाला होवू शकतो Cancer | Lokmat Latest Update | Lokmat News

2021-09-13 0

एका सर्वेक्षणानुसार एटीएम मधून निघालेल्या रिसिप्टमुळे देखील कॅन्सर होऊ शकतो. ही रिसिप्ट थर्मल पेपरपासून बनते. थर्मल पेपरवर बीपीएचे कोटींग असते. हा घटक घरातील इतर सामानातही असतो. मशीनमधून जेव्हा रिसिप्ट निघते तेव्हा ती गरम असते. त्यामुळे बीपीए अगदी सहज त्वचेवर ट्रांसफर होऊ शकतात. एटीएम शिवाय कॅश रजिस्टर आणि कार्ड स्वाईप मशीनमध्येही थर्मल पेपरचा वापर होतो.बीपीए किंवा बिस्फेनॉल ए हे एक धोकादायक रसायन असते. हे रसायन थायरॉईड, इनफर्टिलिटी, वजन वाढणे आणि हृदय रोगाचे कारण होऊ शकते. त्वचा कोरडी असल्यास बीपीए कोटेड थर्मल पेपर पाच सेकंद हातात पकडल्यास त्वचेच्या माध्यमातून मायक्रोग्रॅम बीपीए ट्रांसफर होतात. पण जर तुमचा हात ओला किंवा त्याला घाम आलेला असेल तर बीपीए ट्रांसफर होण्याची संख्या दहापटीने वाढते. याचा अर्थ दिवसाला दहा तास असे पेपर, रजिस्टर पकडल्यास त्यातून ७१ मायक्रोग्रॅम बीपीए ट्रांसफर होऊ शकतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires