तुम्ही शाम्पू वापरताय ? जाणून घ्या कसा ठरू शकतो घातक | Health Updates | Lokmat News

2021-09-13 1

पुणे येथून बनावट ब्रँडेड शाम्पू बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. डव, सनसिल्क, हेड अँड शोल्डर आणि लॉरियल अशा नामांकित कंपनीचे बनावट शाम्पू कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
पिंपरीतील कामगार नगर येथील गंगा सोसायटी येथे भाडेतत्वावर राहणाऱ्या निजामोद्दीन बशीर खान उस्मानी , इस्लाम गफूर खान अली सय्यद , इसाकखा शमशुद्दीन तेली , निजाम नूरहसन तेली हे भंगारातून बाटल्या गोळा करत आणि त्यात केमिकल पावडरचा वापर करून शाम्पू तयार करत.हे शाम्पू दुकानांमध्ये व थेट ग्राहकांनाही अल्प दरात विकले जात. याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर येथे राहणाऱ्या भाग्यश्री यादव यांनी फिर्याद दिली आहे. डवच्या ३२५, सनसिल्कच्या १५४, हेड अँड शोल्डरच्या १३० आणि लॉरियल कंपनी च्या १४२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires