SBI च्या 1300 शाखांचे आयएफएससी कोड बदलले जाणून घ्या तुम्ही तुमच्या बँकेचा कोड

2021-09-13 0

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने आपल्या सुमारे 1300 शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत. स्टेट बँकेच्या सर्व सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, चेन्नई,हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊ या शहरां मधील बहुतांश बँकेच्या शाखांच्या नावात हे बदल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात स्टेट बँकेचे प्रबंध निदेशक प्रवीण गुप्ता यांनी सांगितले, आमच्या काही जुन्या सहयोगी बँकांच्या शाखांचे भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. हे विलीनीकरण झाल्याने त्यांच्या आय एफ एस सी कोडमध्ये देखील बदल झाले आहेत.बँकेच्या ग्राहकांना कोड बदलल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर अंतर्गत व्यवहारांसाठी देखील बँकांना नव्या कोडसोबत जोडण्यात आले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires