आता गाड्या धावणार ह्या नविन इंधना वर? संशोधकांनी लावला नवीन शोध | Lokmat News

2021-09-13 0

भविष्यात गाड्या पेट्रोलवर नाही तर चक्क बिअरवर धावणार आहेत,असा दावा इंग्लडमधील संशोधकांनी केला आहे. बिअरमध्ये आढळणाऱ्या इथेनॉलवर रासायनिक प्रकिया करून त्यापासून बायोइथेनॉल तयार करता येईल.ज्याचा वापर गाडयांचे इंधन म्हणून करता येणार आहे. इंग्लड मधील ब्रिस्टल युनिव्हर्सिटी तील संशोधकांनी पेट्रोल व डिझेलला पर्याय यावर नुकतेच संशोधन केले. यावेळी मद्यात आढळणाऱ्या इथेनॉलचा वापर पेट्रोल म्हणून करता येणं शक्य नसल्याचं संशोधकां च्या निदर्शनास आलं. पण इथेनॉलवर रासायनिक प्रकिया करून त्यापासून ब्यूटेनॉल तयार होते. ज्याला बायोइथेनॉल असे म्हणतात. त्याचा उपयोग इंधन म्हणून करता येतो, असं संशोधकांना आढळलं.
संशोधनादरम्यान सर्व प्रकारच्या मद्यांमध्ये बिअर हेच असं एकमेव मद्य आहे, ज्यावर रासायनिक प्रकिया करून ब्यूटेनॉल तयार करता येतं असल्याचं संशोधकांना आढळलं. दरम्यान या सर्व प्रकियेसाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या पेट्रॉल टंचाईला बायोइथेनॉल हा उत्तम पर्याय असणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires