काही लोक काम करताना अनेक वेळा चुटकी वाजवून बोलतात. ही सवय वाईट मानली जाते. चुटकी वाजवल्याने तुमचं वाईट इम्प्रेशन पडतं हे देखील तेवढंच सत्य आहे, तेव्हा कुणाशी बोलताना चुटकी वाजवून, ऑर्डर केल्यासारखं बोलू नका.वडीलधारी माणसे या सवयीपासून लांब राहण्याचे सांगतात, पण ही सवय स्नायू आणि सांध्यांसाठी चांगला व्यायाम प्रकार आहे. तेव्हा एकांतात असताना, व्यायाम म्हणून चुटकी वाजवा.सांध्यामध्ये सिनोविअल फ्लूड असते. चुटकी वाजवल्याने त्यावर दबाव पडतो आणि त्या द्रवात हवेचे बुडबुडे तयार होतात. त्यामुळेच आवाज निर्माण होतो.चुटकी वाजवल्याने सांध्यांना आराम मिळतो तसेच त्यांचा लवचीकपणा वाढतो. या सवयीमुळे बोटांच्या सांध्यांना कोणतीही इजा होत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews