‘पद्मावती’ चित्रपटाच्या मुद्द्यावरुन काही तोडगा निघतो का ह्या विचारात सध्या भन्साळी आहेत. त्यामुळे ते सर्वच दृष्टीने चित्रपटाच्या हिताचा विचार करु लागले आहेत. यासाठी त्यांनी अभिनेता रणवीर सिंगलाही समज दिल्याचे म्हटले जातय.नेहमीच अतीउत्साहात असणाऱ्या आणि त्याच उत्साहात सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देणाऱ्या रणवीरच्या स्वभावावरुन भन्साळींनी त्याला ही ताकिद दिल्याचे कळते. त्याचा हा दिलखुलास पणा अनेकांना आवडतो. पण, भन्साळींना त्याच्यामुळे आता वेगळीच चिंता भेडसावू लागली आहे. भन्साळींनी रणवीरला बोलवून घेत त्याच्या अतिउत्साही वागण्याला आवर घालत ‘पद्मावती’ प्रदर्शित होईपर्यंत नीट वागण्याची समज दिली आहे.चित्रपटाच्या दृष्टीने आता भन्साळी फार सावधगिरीने पावलं उचलत आहेत. कलाकारांची मेहनत, निर्मात्यांचे पैसे आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा या सर्व गोष्टींचे महत्त्वं लक्षात घेत भन्साळी आता चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांनीही योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews