कोलकाता पोलिस नेव्हीप्रमाणे का घालतात ड्रेस? जाणून घ्या कारण | Kolkata Police News

2021-09-13 417

भारतातील बहुतांश पोलिसांना खाकी रंगाची वर्दी आहे. मात्र तुम्ही कोलकाताला गेल्यास तुम्हाला रस्त्यावर पांढऱ्या पोषाखातील पोलिस दिसतील. तुम्ही कधी विचार केला आहे का? की देशभरातील पोलिस खाकी वर्दी घालतात. मात्र कोलकाता पोलिस पांढरा पोषाख का परिधान करतात‌? कोलकाता पोलिसांचा युनिफॉर्म उगाचच पांढरा नसतो. त्यामागे विशेष कारण आहे. यामागे इंग्रज राजवटीचा हात आहे. कोलकाता पोलिसांची स्थापना 1845 मध्ये करण्यात आली होती. आझादीनंतर इंग्रज निघून गेले. मात्र त्यांनी कोलकाता पोलिसांसाठी पांढऱ्या युनिफॉर्म सोडून गेले. दरम्यान, समुद्र जवळ असल्याने इंग्रजांनी पांढरा युनिफॉर्म निवडला होता. ज्यामुळे सुर्याच्या प्रखर उन्हामुळे त्यांना त्रास होणार नाही.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires