चक्क BBC News ने केली घोडचूक । शशी कपूर यांचे चाहते झाले नाराज पहा हा व्हिडिओ

2021-09-13 1

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदिर्घ आजाराने काल (सोमवार दि.04) निधन झाले. मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  शशी कपूर यांनी केवळ हिंदीच नव्हे तर इंग्रजी चित्रपटात देखील काम केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मीडियाने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. 

अचूक बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बीबीसीने शशी कपूर यांच्या निधनाची बातमी दाखवताना एक मोठी चूक केली. बीबीसीने शशी कपूर यांच्या निधनाची बातमी दिल्यानंतर त्यांच्या गाण्यांचा व्हिडिओ दाखवण्या ऐवजी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या गाण्यांचा व्हिडिओ दाखवला. 

बीबीसीची ही चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांनी त्यावर जोरदार टीका केली. याप्रकाराबद्दल बीबीसीने माफी मागितली. 


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires