खामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याघरासमोर शेतकर्यांनी बोंडअळीची होळी केली. जोपर्यंत कृषीमंत्री भेटत नाही तोपर्यत उठणार नाही अशी भूमिका घेत तब्बत चार तास शेतकर्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. s