माझा लढा नारायण राणे यांच्याविरुद्ध नाही तर त्या प्रवृत्तीविरुद्ध - दीपक केसरकर

2021-09-13 0

दापोली (रत्नागिरी) : माझा लढा नारायण राणे यांच्याविरुद्ध नाही, तर माझा लढा त्या प्रवृत्तीविरोधात आहे, असा टोला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी लगावला.
राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गतच्या क्रीडा स्पर्धांना आज दापोलीत प्रारंभ झाला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नारायण राणे यांना भाजपाने थेट पक्षात न घेता स्वतंत्र पक्ष काढायला लावला. आता विधान परिषदेची उमेदवारीही भाजपाने प्रसाद लाड यांना दिली आहे. खरं तर माझा राणेंशी वैयक्तिक लढा नाही. त्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. कोकण हा बुद्धिमत्तांचा आहे आणि बुद्धिमत्तांना शांतता प्रिय असते त्यासाठीच आपला लढा असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

Videos similaires