वर्धा : कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी वेगळी शक्कल लढविली. घोराड येथे शेतक-यांनी ट्रॅक्टरचलित वीजनिर्मिती यंत्राचा वापर करून ओलित केले. यात वेळेची बचत होते असली तरी ओलिताचा खर्च मात्र वाढला आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रावर ५, ३, ७.५ ते २ अश्वशक्ती मर्यादा असलेले विद्युतपंप कार्य करतात. यावर ६० स्प्रींकलरचे नोझलने सिंचन करता येते. कमी वेळात जास्त ओलित करणे शक्य होत आहे.