नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील बोणडर येथे ट्रक व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झालेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्यानं संतप्त नागरिकांनी महामार्ग अडविला. नागरिकांच्या आंदोलनामुळे तीन तासांपासून हा मार्ग ठप्प झाला.