मुंबईच्या चिंचपोकळी भागात राहणारा तरुण मिसाख नेवहीस ह्याचे 27 ऑक्टोबर रोजी कँसरमुळे निधन झाले होते. परंतु निधनानंतर सुद्धा अंधश्रद्धेमुळे 10 दिवसांपर्यंत चर्च मध्ये ज्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिसाख नेवहीस च्या मृत्युनंतर सुद्धा त्याच्या आई वडिलांचा ह्यावर विश्वास बसत नव्हता आणि ते शेवटची आशा म्हणून आपल्या मुलाला घेवून नागपाडा येथील जीजस फोर ऑल नेशन्स चर्च च्या फादर कडे गेले. पादरी ने मिसाख ला जिवंत करण्याचे आश्वासन दिले आणि ७ दिवसांपर्यंत अनेक प्रार्थना आणि वेगवेगळे प्रयोग होत राहिले. ह्या गोश्ची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचली. आणि प्रेताचा अंत्यविधी करण्यास सांगितले. आई वडील तयार सुद्धा झाले. परंतु पोलीस तिथून जाताच ते परतला घेवून अंबरनाथ चर्च मध्ये पोहचले. पोलिसांना दुसऱ्यांदा समज द्यावी लागली. ह्यानंतर पोलिसांच्या समक्ष प्रेताचा दफनविधी करण्यात आला. पादरी ने विश्वास दिल्यामुळेच आई वडिलांनी प्रेताला दफन केले नव्हते. अंधश्रद्धा पसरवल्यामुळे पोलीस आता पदरी आणि संबंधित चर्च च्या विरोधात गुन्हा दाखल करू शकते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews