कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने मारोती ट्रेडींग कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी छापा टाकून कमी जाडीच्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. जप्त केलेला सदर मुद्देमाल सुमारे पाच लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews