ब्रह्मांडांतील रहस्यांचा मागोवा घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी सूर्यमालेबाहेर २० ग्रह अस्तित्वात असल्याचा दावा केला असून यातील काही ग्रहांवरील वातावरण आणि पृथ्वीवरील वातावरण यात साम्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे या ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सूर्यमालेबाहेरील रहस्य शोधण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी केप्लर ही मोहीम राबवली होती. या मोहिमेतंर्गत हे २० ग्रह सापडल्याचे नासाने म्हटले आहे. या २० ग्रहांपैकी काही ग्रहांवरचे तापमान पृथ्वीशी मिळते जुळते असून या ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहेआमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews