क्रिकेटच्या मैदानात अनेकांच्या विकेट घेणाऱ्या जहीर खानची ‘चक दे गर्ल’ अभिनेत्री सागरिका घाटगेनं विकेट घेतली. अनेक दिवसांपासून जहीर आणि सागरिका रिलेशनशिपबाबत चर्चा होती. त्यानंतर मे महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला. मात्र आता दोघांच्या लग्नाची वाट सगळे पाहत आहेत. जहीर सागरिकाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला असून नोव्हेंबर महिन्यात या दोघांचे लग्न आहे. आता जहीर आणि सागरिकाचा विवाह सोहळा नेमका कसा असेल असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. याबाबतही या दोघांनी खुलासा केला आहे. सागरिका घाटगे हिंदू आणि जहीर खान मुस्लीम असल्याने त्यांच्या विवाह सोहळा नेमका हिंदू पद्धतीनं होईल की मुस्लीम पद्धतीनं होईल याची उत्सुकता सगळ्यांना आहे. माध्यमांशी बोलताना याबाबत या दोघांनी खुलासा केला आहे. २७ नोव्हेंबरला आम्ही विवाह करणार आहोत. आम्ही हिंदू पद्तीनं ‘सात फेरे’ घेणार नाही तसेच मुस्लीम पद्धतीनं ‘निकाह’ देखील करणार नाही, असं दोघांनीही स्पष्ट केलं. आम्ही कोर्ट मॅरेज करणार असल्याचं जहीर-सागरिकाने सांगितलं आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळीसाठी विवाहाआधी आणि नंतर काही कार्यक्रमांच आयोजन पुण्यात आणि कोल्हापूर करणार असल्याचं दोघांनी सांगितलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews