माचल प्रदेश येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एक अनोखा योग जुळून येणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मतदान केलेले श्याम शरण नेगी या निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबरला मतदान करणार आहेत. वयाच्या शंभरीत पोहचलेले नेगी गेली 66 वर्षे मतदानाचा हक्क बजावत आहेत, ही अतिशय कौतुकाची बाब आहे. किन्नोर येथे राहणारे नेगी यांच्या हालचालींवर वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. हे लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था केली आहे.विशेष म्हणजे 100 वर्षाच्या या गृहस्थाचे मतदान केंद्रवर विशेष पद्धतीने स्वागत करण्यात येईल. लाल पायघड्या घालून त्यांचे स्वागत केले जाईल. किन्नोर येथे पहिले मतदान 25 ऑक्टोबर 1951 मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने 1952 च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews