अभिनेता कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या ‘नोटाबंदी’च्या निर्णयाला दिलेला पाठिंबा ही आपली चूकच होती. त्याबद्दल आपण माफी मागतो, असे जाहीर केले आहे. एका तामीळ मासिकात ‘नोटाबंदी’वर लिहिलेल्या लेखातून त्याने आपला ‘माफीनामा’ जाहीर केला आहे.नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळय़ा पैशाला चाप बसेल. त्यामुळे जनतेने थोडी कळ सोसावी असे वाटल्याने आपण नोटाबंदीला त्यावेळी पाठिंबा दिला, पण घाईने दिलेला पाठिंबा ही आपली चूक होती, असे कमल हसन याने म्हटले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्याबद्दल अर्थशास्त्राची जाण असलेल्या मित्रांनी माझी त्याचवेळी खिल्ली उडवली होती, असे त्याने लेखात नमूद केले आहे.स्वतःच्या चुका मान्य करतो तो चांगला नेता असतो. महात्मा गांधी यांनीसुद्धा आपल्या चुका कबूल केल्या होत्या. सध्याचे नेतेही तसे करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची चूक मान्य केली तर त्यांना मी सॅल्यूट करेन असं कमल हसनने म्हटलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews