आपल्या चुका कोणी दाखवल्याचं तर आपण त्याला शिव्यागाळी करू किंवा मग मारामारी ही करू पण फेसबुकने काहीतरी वेगळं केलं आहे. 'फेसबुक वर्कप्लेस'मध्ये त्रुटी शोधून काढणारी विजेती ठरली आहे विजेता पिल्लई. 'फेसबुक'मध्ये 'बग' (एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राममधील त्रुटी किंवा चूक) असू शकते, हे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील एका महिलेने सिद्ध केले आहे. विजेता पिल्लई ही भारतातील पहिलीच महिला आहे तिने अॅपमध्ये त्रुटी शोधून काढल्याने 'फेसबुक'ने तिला 65000 रुपयांचे (1000 डॉलर) बक्षिस जाहीर केले आहे. फेसबुकने नुकतेच आपले बिझनेस चॅटिंग अॅप वर्कप्लेस लॉन्च केले होते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हे अॅप सर्वाधिक वापरले जाते. वर्कप्लेसमध्ये बग आढळल्याने हे अॅप वापरणार्या कंपनीच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो, हेही विजेता यांनी फेसबुकच्या निदर्शनास आणून दिले आहे. वर्कप्लेस हे फेसबुक सारखेच वापरता येते. या माध्यमातून यूजर्स पोस्ट, कमेंट आणि मेसेज पाठवू शकतो. परंतु, या अॅपचा वापर केवळ संस्थेचे कर्मचार्यांपर्यंतच मर्यादीत असतो. या अॅपला अॅडमिन संस्थेतील इतर कर्मचार्यांना कंपनीच्या थेट अकाउंटशी जोडतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews