एनर्जी ड्रिंक पिताय मग हा व्हिडीओ बघाच, ऑपरेशन सलग ५ तास सुरु होतं.

2021-09-13 0

एनर्जी ड्रिंक पिताय मग हा व्हिडीओ बघाच, ऑपरेशन सलग ५ तास सुरु होतं.

बऱ्याच वेळा असे होते कि अनेक गोष्टींची आपल्या इतक्या सवयीच्या होतात कि, त्या सवयीचं कधी व्यसन होत याचा पत्ता ही लागत नाही. असंच घडलं अमेरिकेत राहणाऱ्या ऑस्टिन सोबत. कामाचा क्षीण कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात एनर्जी ड्रिंकमुळे त्याच्या दुष्परिणामाना समोरं जावं लागलं. एनर्जी ड्रिंकच्या अति प्यायल्यामुळे ब्रेन हेमरेज झाला. त्यावेळेस त्यांची पत्नी गरोदर होती. सोशल मीडियाचा वापर करीत त्यांनी सांगितलं जेंव्हा त्यांना ऑस्टिनच्या हेमरेज बद्दल इस्पितळात दाखल झालं हे कळालं तेंव्हा त्या झोपल्या होत्या, त्यांना हे समजताच मोठा धक्काच बसला. ऑस्टिनच ऑपरेशन सलग ५ तास सुरु होतं. त्यानंतर ते पुढील २ आठवडे कोमात राहिले. या दिवसात या दाम्पत्याला संतान प्राप्ती झाली होती. दवाखान्यातून ऑस्टिन २ महिन्यांनी परतला आणि तेंव्हा तो आपल्या लहानग्या बाळाला पाहू शकला.

Videos similaires