या बाईला म्हणतात " मूल तयार करणारी मशीन. "
आई होणं वरदान असू शकत पण कितपत !
सध्याच्या महागाईच्या जगात अनेकांना एका अपत्याला जन्म देण्याकरता त्याच्या जन्माच्या योजना (चाईल्ड बर्थ प्रिप्लॅन) कराव्या लागतात. त्यामुळे मुले जन्माला घालण्याआधी आईवडील सल्लाघेऊन मग तयारीस लागतात. त्यात कोण्या स्त्रीला तिच्या वयापेक्षा जास्त मुलं असणं ! म्हणजे आपण आश्चर्याने बोटं चावल्या शिवाय राहणार नाही. .. पण, मरियमची कहाणी मात्र तुम्हाला तुमचे विचार बदलायला भाग पाडेल. युगांडाची रहिवाशी असणारी मरियम नबातांजी ही ३७ वर्षाची महिला ३८ मुलांची आई आहे. मरियमने तिच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला तेव्हा ती केवळ १३ वर्षाची होती. वयाच्या १२ व्या वर्षीच तिचा विवाह झाला होता. मात्र एवढी मुले म्हटल्यानंतर युगांडाच्या मुकोनो जिल्ह्यातील कबिम्बिरी गावात राहणा-या मरियमला स्थानिक लोक ‘मुलं तयार करणारी मशीन’ म्हणतात.
मरियमने आत्तापर्यंत सहा वेळा जुळ्या, चार वेळा तिळ्या आणि तब्बल तीन वेळा चार मुलांना एका वेळी जन्म दिला. जर हीच महिला भारताची नागरिक असती तर लोकसंख्येचा विस्फोट यांच्याच घरी झाला असता!