पुणे: शासन तुला सेविका मदतनीसची कदर नाय? नाय का? सेविकेला कामे देता केवढी केवढी हातावर टेकवता कवडी कवडी कवडीचा आकार कसा गोल गोल सेविका तू सगळ्यांशी गोडबोल. शासन तुला सेविका मदतनीसची कदर नाय का? नाय का? अशा कविता सादर करून अंगणवाडी महिला कर्मचारी वर्गाने शासनविरोधात आपल्या विविध मागण्यांसाठी शिवाजी पुतळा, कोथरूड येथे महाभोंडल्याचे आयोजन केले होते.