अहमदनगरमधील परिट वस्तीवर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 31 नागरिकांची लष्कर व एनडीआरएफच्या जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. बुधवारी ( 20 सप्टेंबर ) अरणगाव येथील तलाव फुटल्यानंतर आलेल्या पुराचा वाळुंज येथील परिट वस्तीला वेढा पडला. यानंतर लष्कर व एनडीआरएफच्या जवानांनी या नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढले.