मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून (19 सप्टेंबर )पावसाची संततधार कायम आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचले आहे. मंगळवारी रात्री गोरेगाव येथे वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवरही पावसाचे पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान, येत्या 72 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.