महात्मा बसवेश्वर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावे, या मागणीसाठी लिंगायत समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे, विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी करत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निवेदनाची पत्रकं भिरकावत भंडारा उधळला.