वाडेगाव(अकोला) यंदा पावसाने वेळेवर दांडी मारल्याने येथील शेतकऱ्याचे सोयाबीन पीक पूर्णतः बुडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यासाठी आज वाडेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सोयाबीन पिकाची प्रेतयात्रा काढण्यात आली. अंतयात्रेच्या प्रमाणेच समोर एकजण तिरडी घेऊन या प्रेतयात्रेत बघायला मिळाला. हजारोच्या संख्येने शेतकरी यात सामील होत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रेतयात्रा संपूर्ण गावात फिरविली.यात सरकार आमचे आसू पुसणार का ? सोयाबीन खल्लास तर शेतकरी खल्लास ! असे अनेक फलक या प्रेतयात्रेत नागरिकांना बघायला मिळाले.