नांदेडमध्ये दमदार पाऊस

2021-09-13 173

तब्बल महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सकाळपासून नांदेडमध्ये जोरदार सुरवात केली. शनिवारी रात्रभर हा पाऊस सुरु होता. रविवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. तर अनेक दुकानामध्येही पाणी शिरले होते.