सांगली - संतोष राजेशिर्के (भोर, जिल्हा पुणे) हा मराठा कार्यकर्ता भोर ते मुंबई रिव्हर्स कार चालवत मराठा मोर्चाला निघाला आहे. तो सध्या लोणावळ्यापर्यंत पोहोचला आहे. त्याच्या कारच्या मागे आणि पुढे बुलेट धावत आहे. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मराठा बांधव त्याला प्रोत्साहन देत आहेत.