नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा
2021-09-13
0
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला. या पार्श्वभूमीवर नठीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.