यवत : पंढरीच्या वाटेवर संत शिरोमणी तुकाराम पालखी सोहळ्याचा मुक्काम आज यवत येथे आहे. दौंड तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा यवत मधील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावतो. यवतमध्ये पालखी मुक्कामी आल्यानंतर परंपरेप्रमाणे पिठले-भाकरीचे भोजन दिले जाते. पुणे शहरातील गोडधोड जेवणानंतर ग्रामीण ढंगातील चुलीवरील भाकरी व सुग्रास पिठाल्याचे जेवण लाखो वारकऱ्यांचे खास पसंतीचे जेवण असते.