कोल्हापूरच्या अंबाबाईला घागरा चोळी नेसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल

2021-09-13 19

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला पारंपरिक काठापदराच्या साडीऐवजी घागरा-चोळी नेसविण्यात आल्याने कोल्हापूरकर आणि एकूणच भाविकांमधून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत होता.
रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान शहरातील सर्व तालीम मंडळ व संस्था एकत्र येऊन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सदर पूजा बांधलेल्या पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागण्यांसाठी एकत्र येऊन जोरदार घोषणाही दिल्या यानंतर पोलीस प्रशासनाने संबंधित पुजारी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या सह दोघांवर कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावने) अन्वये गुन्हा दाखल केला.

Videos similaires