ओला कचरा जिरवून पुण्याच्या महापौरांनी साकारली बाग

2021-09-13 0

कच-याचे वर्गीकरण आणि ओल्या कच-यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचे आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येते. मात्र, लोकप्रतिनिधी स्वत:च त्याचे अनुकरण करीत नाहीत, असा नागरिकांमध्ये समज असतो. या गैरसमजाला महापौर मुक्ता टिळक यांनी फाटा दिला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन ते साडेतीन टन कचरा जिरवून त्यांनी घराच्या छतावर सुंदरशी बाग तयार केली आहे.